कावळेवाडी : संतांनी दिलेले विचार आत्मसाथ करा. सातशे वर्षाची थोर आध्यात्मिक जोड असलेला वारकरीपंथ समाजाला वैचारिक व्यासपीठ मिळवून देणारा आहे. पारायणातून खऱ्या अर्थाने आपल्या मनातील वाईट विकार नाहीसे होऊन निस्वार्थी भावनेची पताका मनात डोलणे. भगवी पताका, रामकृष्णहरी हेच वारकऱ्यांचे संस्कार आहेत, समाजात सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी संताची शिकवण अंगीकारने गरजेचे आहे. अंधश्रद्धा सोडा. मोबाईलचा वापर कमी करा. अंभग पाठ करा. हरिपाठ, पसायदानचा अर्थ समजून घ्या, असे ओघवत्या रसाळ भाषेत वाय. पी. नाईक यांनी विचार व्यक्त केले.
पारायण मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी वाय. पी. नाईक होते.
यावेळी राजेंद्र भातकांडे, जी. एस. देशपांडे, रवींद्र हंपीहोळी यांच्याहस्ते मुहूर्तमेढ करण्यात आले.
गावातून मुहूर्तमेढची टाळमृदगांच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. पारायण मंडळाच्यावतीने सलग चोवीस वर्षे तुकारामबीज दिवशी पारायणचे आयोजन केले जाते.
याप्रसंगी राजेंद्र भातकांडे, ऍड. नामदेव मोरे, गोपाळराव देशपांडे, ह.भ.प.शिवाजी जाधव, मारूती बाचीकर यांनीही विचार मांडले.
या कार्यक्रमाचे औचित्यसाधून गावातील पै. स्वस्तिक मोरे यांचा रोख रक्कम देऊन आमदार लक्ष्मी हेबाळकर हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी विशेष सन्मान राजेंद्र भातकांडे, जी. एस. देशपांडे, रवींद्र हंपीहोळी यांचा वाचनालयचे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर वाय. पी. नाईक, जोतिबा मोरे, कलापा यळूरकर, नामदेव मोरे (वकील), केदारी कणबरकर, मनीषा सुतार (ग्रामपंचायत सदस्य), गोपाळराव देशपांडे, राजेंद्र भातकांडे, रवींद्र हंपीहोळी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत शिवाजी जाधव यांनी केले.
यावेळी एम.पी. मोरे, लक्ष्मण जाधव, मारूती भ. मोरे, सौ.गंगुबाई य. मोरे, पृथ्वी जाधव, मनोहर प. मोरे, देवेंद्र गावडे, संजू ओऊळकर, राजू बुरूड, नारायण कार्वेकर, शिवाजी बाचीकर, चुडापा यळुरकर, जयवंत बाचीकर, भरमाणा मोरे, परशराम मोरे, उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मी हेबाळकर, मनोहर बेळगावकर, मृणाल हेबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta