Tuesday , December 9 2025
Breaking News

विश्वेशरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान सोहळा शुक्रवारी; राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती

Spread the love

 

बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा.टी.जी. सिताराम (नवी दिल्ली) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू विद्याशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पदवीदान समारंभ आणि विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात अधिक माहिती देताना प्रा. विद्याशंकर म्हणाले, तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. याकडे लक्ष देऊन विद्यापीठाच्या वतीने नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकडे विशेष लक्ष देऊन विद्यापीठाचे काम जलद गतीने पार पाडले जात आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने जपान आणि युएसए येथील प्रतिष्ठित विद्यापीठांशी संलग्न काम सुरू केले आहे. पुढील काळातही अमेरिका व अन्य इच्छुक देशातील विद्यापीठांसोबत काम सुरू केले जाणार आहे.

शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात व्याबको इंडिया लि. चेअरमन एम. लक्ष्मीनारायण तसेच बेळगावचे उद्योजक बेलगाम फेरोकास्ट इंडिया प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन सबनीस यांच्यासह टोयोटा किर्लोस्कर मोटरची व्हा. चेअरपर्सन स्वर्गीय विक्रम किर्लोस्कर यांना मरणोतर डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभात 707 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी बहाल करण्यात येणार आहे. विविध विषयात गुणवत्ता विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके बहाल करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना राहिलेल्या विषयांची पदवी परीक्षा देण्याची सुवर्णसंधी प्रदान करण्यात आली आहे. कुलगुरू विद्याशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यापीठाचे रजिस्टर प्रा.बी.ई. रंगास्वामी आणि प्रा. टी. एन. श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *