बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत आयोजीत “शिवसन्मान” पदयात्रेला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे.
शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात सदर यात्रेचे नेतृत्व करणारे समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार किनेकर यांनी “शिवसन्मान” पदयात्रेला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. मुंबईत येत्या 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणे आंदोलनाची जनजागृती या “शिवसन्मान” यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे कोंडूसकर यांनी यावेळी नमूद केलं. याप्रसंगी समितीचे सुरेश राजुकर, संजय पाटील, पुंडलिक पावशे, सुहास चौगुले,अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta