बेळगाव : “द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली” आता बेळगाव परिसरात घडत आहेत. रब्बी हंगामातील पिकाची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत यातच बेळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्विस वायरच्या स्पर्शाने ट्रॉलीतील पिंजर जळून शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा मिळत आहे. यातून शेतकरी वर्गात मोठी घबराट पसरली आहे.
बेळगाव तालुक्यात खरीप हंगामात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, याची मळणी झाल्यानंतर वाळलेले पिंजराच्या गंजी शेतामध्ये घातल्या जातात. फेब्रुवारी महिन्याच्या अखेर नंतर या गवतगंजीची साठवणूक शेतकरी आपल्या परिसरात करत असतात. यामुळे आता या कार्याला जोर आला आहे. बेळगाव तालुक्यातील पिंजराला बैलहोंगल, कित्तूर चंदगड तालुक्यातील शेतकरी वर्गातून मागणी असते. हे पिंजर नेण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीचा उपयोग करतात, दूरचा प्रवास असल्याने हे शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात या पिंजराची साठवणूक करतात. हे नेत असताना शेतामधील लोंबकळत असलेल्या सर्विस वायरचा अंदाज यांना न आल्यामुळे या वायरचा स्पर्श होऊन पिंजराला आग लागून जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. अशा संकटातून आपला जीवाची बाजी लावून ट्रॉली पासून इंजिन बाहेर काढण्यापर्यंत शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून हे कार्य करावे लागत आहे. यामुळे आता शेतकऱ्याचे जीवन धोक्याचे बनले आहे.अशा घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांना तटपुंजि नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता सावधानतेने हे कार्य करण्याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी दक्ष राहून कार्य केले पाहिजे. तसेच संबंधित ग्रामपंचायते आपल्या गावातील शेतवाडीतील लोबकळणाऱ्या वायर व वाकलेले खांब उभे केले पाहिजेत. यामुळे अशा घटना घडणार नाहीत. गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घटना बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर व हलगा गावामध्ये घडल्या अतिशय गंभीर स्वरूपाचे असून शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून कोणालाही इजा झाली नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करून अशा बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉलीचा घटना घडणार नाहीत यासाठी सावधतेने पावले उचलली पाहिजेत, तरच शेतकऱ्याचे जीवन सुरक्षित राहील.
Belgaum Varta Belgaum Varta