Wednesday , March 4 2026
Breaking News

भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार : मान्यवरांकडून श्रद्धांजली

Spread the love

 

बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर (वय 68) यांचे गुरुवारी 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले.

शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचे आगमन झाले आणि त्यांनी दिवंगत राजीव दोड्डण्णावर यांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के.पी.सी.सी. कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, वीरकुमार पाटील, अरुण शहापूर, माजी आमदार ए. बी. पाटील, संजय पाटील, कल्लाप्पाण्णा मॅगेनवर, जमीर अहमद, माजी महापौर विजया मोरे, सुनिला हणमन्नवर, हुबळी जैन समाजाचे नेते महेंद्र सिंघवी, अनिल बाफना, आथनी जैन समाजाचे नेते अरुण यलगुद्री यांच्यासह हुबळी, धारवाड, हावेरी, होस्पेट, बेल्लारी, हुक्केरी, कसमळगी, विविध गावातील नेते, माणिकबाग दिगंबरा जैन बोर्डिंग, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो, भारतीय जैन संघटना, जैन युवा संघटनेचे पदाधिकारी, मंदिर विश्वस्त, अनेक मान्यवर उपस्थित होते. राजीव दोड्डण्णावर यांच्या अकाली निधनाबद्दल विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय व्यक्ती, माजी नगरसेवक यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी दुपारी ३ वाजता शहापूर स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *