बेळगाव : होळी आणि रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक पार पडली. रंगोत्सवात सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल, असे कृत्य कोणीही करू नये यासह विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी, सीपीआय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कर्कश्श आवाजातील डॉल्बी, डॉल्बीवरील आवाजाची मर्यादा, वेळेचे बंधन अशा विविध विषयांवर चर्चा करून पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
या बैठकीला एसीपी प्रशांत सिद्धांत गौडा, मार्केट पोलीस स्थानक पीआय प्रिया कुमार, पीएसआय रवी, पीएसआय आय. एच. केरूर, नगरसेवक शिवाजी मन्नोळकर, नगरसेवक राजू भातकांडे, विजय जाधव, प्रा. आनंद आपटेकर, रोहित रावळ, सुरज मुतकेकर, राजू खटावकर, प्रताप मोहिते, सचिन कणबरकर, पांडुरंग चिगरे, संजय नाईक आदी उपस्थित होते. होळी आणि रंगोत्सवाच्या काळात व्यापक बंदोबस्त असणार आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta