

बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा हा राष्ट्रीय पक्षाच्या श्रेयवादाचे केंद्रबिंदू बनले आहे. 2 मार्च रोजी शिवरायांच्या मूर्तीचे शासकीय अनावरण करण्यात आले तर आज काँग्रेसच्या ग्रामीण मतदारसंघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अनावरण करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.
समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकारणासाठी केला जातो. निवडणुका जवळ आल्या की शिवराय आठवतात मात्र एरवी जेव्हा समाजकांटकांकडून शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो त्यावेळी मात्र हे राष्ट्रीय पक्ष मूक गिळून गप्प बसतात. हे सर्व कमी म्हणून की काय आज राजहंसगड परिसरात लावलेले शिवजयंतीच्या शुभेच्छा फलक फाडण्याचे निंदनीय कृत्य ग्रामीण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, नागेश मन्नोळकर, रमेश जारकीहोळी यांच्या शुभेच्छा फलकाची नासधूस करत असताना शिवरायांच्या प्रतिमेची नासधूस करण्यापर्यंत या आमदार समर्थक कार्यकर्त्यांची मजल गेली आहे. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना छत्रपतींचे मावळे आगामी विधानसभेत त्यांची जागा दाखवतील यात शंकाच नाही.
Belgaum Varta Belgaum Varta