बेळगाव : संस्कारपूर्ण शिक्षण उन्नतीसाठी आवश्यक असून संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज असल्याचे भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले.
मजगाव येथील श्री 1008 भगवान दिगंबर जैन मंदिर, रत्नत्रय नगरी येथे श्री सिद्धचक्र आराधना महामंडळ विधान महोत्सव सुरू आहे. 27 फेब्रुवारीपासून सुरू असलेला हा महोत्सव 7 मार्चपर्यंत चालणार आहे.
किरण जाधव यांनी या महोत्सवाला हजेरी लावून स्वामीजींचा शुभाशीर्वाद घेतला.
यावेळी स्वामीजींनी, “तुमच्या हातून लोककल्याणकारी कार्य होवो, तुमचे राजकीय भविष्य उज्ज्वल होवो” असा आशीर्वाद किरण जाधव यांना दिला.
यावेळी मंदिर व्यवस्थापन मंडळाच्यावतीने किरण जाधव यांना गळेपट्टा, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले, मनुष्याला उदरनिर्वाहासाठी कर्म आणि मोक्षासाठी धर्म गरजेचा आहे. यासाठी मनुष्याने चांगले कर्म करण्याबरोबरच धर्माचे अनुसरण करणेही गरजेचे आहे. संस्कारहिन आणि संस्कृतीशून्य मनुष्य हा कूचकामी ठरतो. यासाठी प्रत्येकाने जीवन जगताना धर्माची कास आवर्जून धरावी असेही किरण जाधव म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta