बेळगाव : मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना मच्छे येथे शेतवाडीत घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मजगाव लक्ष्मी गल्लीतील प्रतीक एकनाथ लोहार (वर्ष 23) या युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिरा शेजारी शेतवाडीमध्ये बोलावून नेले. तेथे प्रतीकचा चाकू व जांभ्या भोसकून खून करण्यात आला. मयत प्रतीक लोहार याचा खून करून सदर आरोपी गावात फिरत असल्याची माहिती मिळाली. आरोपीला फिरत असताना काही तरुणांनी पाहिले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुणांच्या हातातून निसटून फरारी झाला.
संबंधित आरोपीवर उद्यमबाग पोलीस ठाण्यामध्ये हाफ मर्डर, गांजा विक्री करणे असे अनेक गुन्हे आहेत. संबंधित आरोपीला त्वरित पकडून अटक करावे व त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी तरुण युवकातून मागणी होत आहे.
वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर प्रकरणाची नोंद झाली आहे. प्रतीक लोहार याचा खून करण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून वडगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत
Belgaum Varta Belgaum Varta