बेळगाव : गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलला काल शुक्रवारी मुंबईच्या महापौर व शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे गट पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी बेळगावच्या शिवसैनिकांनी किशोरी पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बेळगावसह सीमाभाग पक्ष संघटना बळकट करणे तसेच बेळगाव सीमाभागातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. किशोरी पेडणेकर यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात, उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रदीप सुतार आदींसह बेळगाव शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta