Friday , March 6 2026
Breaking News

शहापूर, वडगाव भागात रंगपंचमी उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी बेळगाव तालुक्यासह शहराच्या दक्षिण भागात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. शहरात विशेषत: वडगाव, शहापूर भागात संस्थान कालीन परंपरेप्रमाणे रंगपंचमी साजरी करण्यात आली. तरुणाई आणि बालचमू डॉल्बीच्या तालावर थिरकत होते. अनेक ठिकाणी रंगपंचमीसाठी खास वॉटर शॉवर लावण्यात आले होते. शहापूर कचेरी गल्ली, नार्वेकर गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, नवी गल्ली तसेच वडगाव भागातही रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.

धुलीवंदना दिवशी काही गावात रंगपंचमी साजरी करण्यात आली. मात्र ग्रामीण भागामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी तालुक्यातील अनेक गावे रंगात रंगून गेली होती. सकाळपासूनच ठिकठिकाणी लहान मुलांचा आणि तरुणांचा रेन डान्स पाहायला मिळाला.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत डीजेच्या तालावर जल्लोष रंगला होता. विशेषत: तरुण-तरुणींनी यावेळी नृत्याची मजा घेतली.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *