Thursday , September 19 2024
Breaking News

अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरमुळे एका तरुणाचा बळी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या महांतेशनगर सेक्टर क्रमांक 12 मध्ये लव्ह डेल खासगी शाळेजवळ बांधलेल्या अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरने एका तरुणाचा बळी घेतला आहे.

माहितीनुसार काल संध्याकाळीच हा स्पीड ब्रेकर बांधण्यात आला होता. उंच गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर काही तासातचं काल रात्री उशिरा महांतेशनगर येथील रहिवासी 23 वर्षीय प्रतीक फकीरप्पा होंगल हा दुचाकीवरून येत असताना स्पीड ब्रेकरकडे लक्ष न देता त्याचे नियंत्रण सुटले आणि काही मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आता रविवारी रस्ता आणि स्पीड ब्रेकर निर्माण करणार्‍यांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येताचं तो अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर हटविण्यात आला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतर संबधितांवर आता काय कारवाई होणार पाहावे लागेल. हा एकप्रकारे सरकारी कामाचाचं बळी ठरला असून बेळगावकरांनी काळजीपूर्वक वाहन चालवावी अशीच चर्चा प्रसारमाध्यमावर आहे.

गतिरोधक आणखी किती बळी घेणार?
बेळगाव शहरासह उपनगरातील सर्वच ठिकाणचे गतिरोधक धोकादायक असून अनेकांचा यामुळे बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर संबधित विभागाला जाग येणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात घडल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. पहाटे 5.30 च्या सुमारास मंदिरात जाणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाच्या नजरेस एक तरुण रोडवर पडलेला आढळला. त्यांच्याकडे फोन नसल्याने त्यांनी इतरांकडे फोन मागितला तरी कोणीही मदतीला आले नाही. अखेर आईने प्रतीकच्या मोबाईलवर फोन केला असता, तरुणाचा फोन घेऊन रुग्णवाहिकेला फोन केला, तोपर्यंत तरुणाचा जीव गेला होता. महांतेशनगरच्या अनेक भागात अशास्त्रीय स्पीड ब्रेकर बसविण्यात आले असून ते हाडं मोडणारे बनत असून वारंवार अपघात होत असल्याचा संताप महांतेशनगर येथील रहिवासी व्यक्त करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची विनंती केली आहे. याशिवाय टिप्पर व इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी न करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *