

बेळगाव : काल झालेल्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगांव परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता.
म. ए. समितीच्या माध्यमातून आज सोमवारी गड परिसरात स्वच्छता माहीम राबविण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गड परिसर व पायथ्याशी असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, आर. एम. चौगुले, शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, मदन बामणे, माजी नगरसेवक अमर येळ्ळूरकर, गणेश ओऊळकर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर यांच्यासह बहुसंख्य समिती कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta