बेळगाव : श्री धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक बेळगाव सकाळी 09.30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त पुजन करण्यात आले. सुरुवात प्रेरणा मंत्राने करण्यात आली.
बेळगाव सीमाभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि संघटक तानाजी पावशे, मंगेश नागोजीचे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी बंडू केरवाडकर यांनी बलिदान मासाचे महत्व व संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी उपप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रदिप सुतार, प्रकाश हेब्बानी, विठ्ठल हुंदरे, सनी रेमाणाचे, मयुरेश काकतकर नाताजी बेळवटकर, कुशल ऊरणकर, राजू कणेरी, श्रीशैल हगिदळी, ऋतिक सूर्यवंशी आदि शिवप्रेमी व शिवसैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta