बेळगाव : ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतीने घेण्यात येणार्या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेकरिता बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपचे 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेले बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरुचकडे रवाना झाले.
दिया डी. बनस्कर, ईशान ए. करगुप्पीकर, सतीश पी. पवार, उर्वी व्ही. कुमठेकर आणि वैष्णवी आर. व्हनमनी अशी परीक्षा देण्याकरिता भरुचकडे रवाना झालेल्या कराटेपटूंची नावे आहेत.
कराटे मास्टर दीपक काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कराटेपटू कराटेचा सराव करतात. कराटेपटूंसोबत कराटे मास्टर दीपक काकतीकर, सहाय्यक प्रशिक्षक अमित वेसणे हे भरुचला रवाना झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta