बेळगाव : अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेकडून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दडपण चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
हिंदू नवं वर्षाच्या प्रारंभी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे कलाकारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
याप्रसंगी अनगोळ येथील ज्येष्ठ पंच ज्योतिबा लाटुकर, श्रीराम युवक मंडळाचे अध्यक्ष उमेश कुऱ्याळकर दडपण चित्रपटातील सर्व कलाकार व म्युझिक टीम टेक्निशियन उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांचा परिचय चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संतोष सुतार यांनी दिला तसेच अस्मिता क्रिएशन्सचे संस्थापक श्री. राजेश लोहार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रज्योती देसाई यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta