बेळगाव : शहरातील इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी हॉटेल संकमच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली.
सदर वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद पाटील हे होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे अध्यक्ष अरविंद पाटील, उपाध्यक्ष मनोहर परमार, खजिनदार बाबुलाल जैन आदी पदाधिकाऱ्यांनी देखील आपले मार्गदर्शनपर विचार मांडले. सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्यामुळे असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीच्या अधिकारपदाच्या कालावधीला सर्वानुमते मुदत वाढ देण्यात आली. आजच्या सभेस इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिव डायमंड दोशी यांनी केले. शेवटी नवरतन सिंह यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta