बेळगाव : सुळगे (हिं.) शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगे (हिं.) येथे वायव्य शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. प्रकाश बा. हुक्केरी यांच्या अनुदानातून मलनाडू अभिवृद्धी मंडळ यांच्याकडून 24 लाख 50 हजारांचा निधी दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी मंजूर झाला आहे. या वर्ग खोल्यांचे भूमिपूजन सोमवार दिनांक 27-3-2023 रोजी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या माननीय आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र श्री. मृणाल हेब्बाळकर, सुळगा गावचे काँग्रेस प्रमुख व ग्राम पंचायत सदस्य श्री. भागाण्णा नरोटी आणि ग्राम पंचायत सदस्य श्री. यल्लाप्पा कलखांबकर यांच्या अमृत हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील, सेक्रेटरी बी. डी. पाटील, संचालक अशोक चंद्रू पाटील, कृष्णा ओमाण्णा पाटील, प्रकाश महादेव पाटील, प्रकाश लक्ष्मण पाटील, कॉन्ट्रॅक्टर जे. पी. मुचंडी, परशराम तोरे, आर. एन. हुलजी, सिद्धय्या धारवाडमठ, कर्नाटक राज्य प्रौढशाळा सहाय्यक शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी रामू अ. गुगवाड, शाळेचे मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर, शिक्षकवृंद व कर्मचारी, न्यू मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम पाटील व शिक्षकवृंद. तसेच कलमेश्वर हायस्कूल मण्णूरचा शिक्षकवृंद व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta