
अध्यक्षपदी सुनिल मुतगेकर तर सचिवपदी लक्ष्मण शिंदे यांची निवड
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन या संघटनेच्या २०२३ सालच्या पदाधिकारी आणि संचालकांचा अधिकारग्रहण सोहळा आज रविवार दि. ०२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.
जायंट्स मेनची स्थापना १९८६ ला झाली असून यावर्षी या संघटनेने ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. या संघटनेने अनेक समाजोपयोगी कामे करून एक वेगळा नावलौकिक मिळवला आहे.
अशा या संघटनेच्या अध्यक्षपदी सुनिल मुतगेकर, सचिवपदी लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्षपदी अविनाश पाटील, अरुण काळे तर खजिनदारपदी विजय बनसुर यांची निवड झाली आहे.
तर संचालक म्हणून अजित कोकणे, सुनिल चौगुले, राहुल बेलवलकर, विश्वास पवार, गावडू पाटील, अनिल चौगुले, राजू जैन, महेश रेडेकर, दिगंबर किल्लेकर आणि आनंद कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
अध्यक्ष सुनिल मुतगेकर हे बांधकाम व्यावसायिक असून गेल्या आठ वर्षांपासून जायंट्सच्या माध्यमातून सक्रिय समाजसेवा करत आहेत.त्यांनी दोन वेळा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सलग दोन वर्षे त्यांना उत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून जायंट्स इंटरनॅशनलने सन्मानित केले आहे. लाल बहाद्दूर शास्त्री गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार म्हणूनही काम पाहिले आहे.
सचिव लक्ष्मण शिंदे हे बीकॉम एलएलबी पदवीधारक असून. कुशल ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत, एक उत्तम योग शिक्षक म्हणून त्यांचा परिचय आहे. जायंट्सचे तीन वर्ष खजिनदारपद भूषविले, शास्त्रीनगर पंच कमिटीचे खजिनदार असून गणपती मंडळाचे ६ वर्षे खजिनदार पद भूषविले आहे.
अविनाश पाटील हे अँल्यूमिनीयम फैब्रिकेशनचा व्यवसाय करतात आणि गेल्या बावीस वर्षापासून जायंटस्मध्ये कार्यरत आहेत,त्यांनी तीन वेळा सचिव म्हणून तर एकदा खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
अरुण काळे हे पदवीधारक असून बॉश पंप दुरुस्तीचा व्यवसाय आहे. ते गेली अनेक वर्षे जायंट्समध्ये सक्रिय असून यापूर्वी दोन वेळा खजिनदार म्हणून काम केले आहे. ते एसपीएम रोड गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत.
खजिनदार विजय बनसुर हे बी कॉम एल एल बी असून त्यांनी केशव सिमेंटमध्ये आर्थिक आणि कायदेशीर विभाग प्रमुख म्हणून पंचवीस वर्षे काम केले आहे. त्यांनी जायंट्सचे सचिवपदही सांभाळले आहे, ते योग मार्गदर्शन केंद्र वडगावचे अध्यक्ष आहेत.
या अधिकारग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअरचे फौंडेशनचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta