Friday , March 6 2026
Breaking News

सीमाभागातील 865 गावांना मिळणार जन आरोग्य योजनेचा लाभ

Spread the love

 

मुंबई : कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिंदे – फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे.
कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रातील नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना त्यांनाही लागू होतील. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनादरम्यान घोषणा केली होती.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव, कारवार, गुलबर्गा व बिदर जिल्ह्यातील 12 तहसील मधील 865 गावातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य गटातील कुटुंबे व अन्नपूर्णा शिधापत्र धारक कुटुंबाचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेस काही बदल झाल्यास या गावातील लाभार्थी कुटुंबातील लागू होणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय जाहीर केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *