बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने आज गुरुवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली.
शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्याद्वारे बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने शिव पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली. यावेळी नितीन कपिलेश्वरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन केले. कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, तानाजी पावशे, मयुरेश काकतकर, राजू कनेरी, प्रकाश हेब्बाजी, अनिकेत नरगुंदकर, विठ्ठल हुंदरे, ज्योतिबा पालेकर, अमर कंग्राळकर, संकेत गोरले, आकाश गोरले, सानिका गोरले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta