Friday , March 6 2026
Breaking News

दक्षिणमधून किरण जाधव यांचे नाव आघाडीवर

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. काही ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले असून कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील भाजपचा उमेदवार निवडीचा पेच सुटता सुटेना असे म्हणण्याची वेळ आली आहे. तिकीटासाठी इच्छुकांनी दिल्लीश्वरकडे साकडे घातले आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदार अभय पाटील व मराठा समाजाचे नेते भाजपचे निष्ठावंत किरण जाधव यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहेत. किरण जाधव हे मराठा समाजाचे नेते आहेत. दक्षिण मतदार संघात 80 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा समाज आहे.
सकल मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांनी बेळगाव येथे मराठा समाज एकसंघ करून समाजाला जागरूक केले व सरकारकडून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. किरण जाधव यांचा जनसंपर्क व कार्य पाहता पक्षाने किरण जाधव यांच्या उमेदवारीचा विचार करण्यास हरकत नाही.
किरण जाधव हे तळागाळातील जनतेपर्यंत पोचलेले नेते आहेत. अत्यंत मितभाषी पण कार्यतत्पर अशी त्यांची जनमानसात ओळख आहे. किरण जाधव यांनी विमल फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन त्यानी केले आहे. किरण जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास भाजपचा विजय सुखकर होणार हे नक्की. आरएसएसचे पाठबळ व मराठा समाजाचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर किरण जाधव हे निश्चित विजय प्राप्त करू शकतील.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *