बेळगाव : यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून मारुती तीपण्णा नाईक यांची घोषणा करण्यात आली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात शुक्रवार दिनांक 14 रोजी ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस एम. जी. पाटील, युवा आघाडीची चिटणीस मनोहर संताजी, दीपक पावशे, मनोहर पाटील, सुरज कणबरकर, नारायण सांगावकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
यावेळी मारुती तिपण्णा नाईक यांची मुलाखत घेण्यात आली व यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते मारुती नाईक यांना पुष्पहार अर्पण करून अर्पण करून त्यांना सदिच्छा देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकिकरण समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta