बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या देशाची वाटचाल ज्या घटनेवर चालते त्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती, शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता ते दीन-दुबळ्यांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या विचार तत्वांवर प्रत्येकाने वाटचाल केल्यास जिवन समृद्ध होईल असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी मांडले.
त्यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स मेनच्या वतीने आंबेडकर गार्डन मधील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष अविनाश पाटील, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसूर, अनिल चौगुले, जयवंत पाटील, मधु बेळगांवकर, भरत गावडे, प्रेमानंद गुरव, महेश शहापुरकर, प्रकाश तांजी, दिगंबर किल्लेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta