बेळगाव : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. मारुती तिप्पन्ना नाईक, सेवा निवृत्त सैनिक यांनी अर्ज दाखल केला.
तब्बल १५ वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने यमकनमर्डी संघातून आपला अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यमकनमर्डी मतदार संघातील मराठी जनतेच्या मनात नव चैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी उमेदवार श्री. मारुती तिप्पन्ना नाईक यांच्यासह श्री. उदय कलघटकर, सूरज कणबरकर, आनंद पाटील, रजनीश आचार्य, महेश सावी आणि इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Belgaum Varta Belgaum Varta