Friday , March 6 2026
Breaking News

भाजप ओबीसी मोर्चातर्फे श्री शिवजयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्च्याचे सचिव व सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जयंती निमित्त आज देश भरात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे बेळगावमध्ये देखील विविध ठिकाणी ती मोठया प्रमाणात साजरी केली गेली. शहरातील छ. शिवाजी उद्यानात आज शनिवारी पहाटे पासूनच शिवभक्त शिवपुजनासाठी उपस्थित होते. यावेळी कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव, भाजप ग्रामीणचे अधीकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जाधव आणि मन्नोळकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. या श्री शिवजयंती कार्यक्रमास भाजप आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *