बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरेनुसार साजरी होणारी शिवजयंती शनिवारी बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
शिवजयंती निमित्त बेळगाव आणि परिसरातील मावळ्यांनी विविध गडांवर रवाना झालेले कार्यकर्ते शनिवारी बेळगावला परतले. तब्बल 50 ते 60 मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचे छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ज्योतीचे पूजन करून प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र आचारला जात होता.
प्रत्येक ज्योतीचे स्वागत महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर यांनी पुष्पहार अर्पण करून केले.
यंदाचे चित्ररथ मिरवणूक 27 मे रोजी शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे, असे मत जे. बी. शहापूरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी गुणवंत पाटील म्हणाले, मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. त्यांचे विचार आणि आचार आजच्या तरूण पिढीने स्मरणात ठेवावेत जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढील जीवनात ते प्रेरणादायी ठरतील. शिवजयंती महामंडळाच्या वतीने बहुजन समाजाचे हित हेच आमचे ब्रीद असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जयजयकार केला शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित गिरीश पाटील, प्रमोद कंग्रळकर, किरण सांबरेकर, अरुण पाटील, प्रसाद मोरे, नितीन जाधव, विद्या पाटील, सुलोचना खनुकर मिथाली अनगोळकर, प्रियंका पावशे, पल्लवी ढवळे, यासह अन्य शिवभक्त उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta