

बेळगाव : म. ए. समितीचे अधिकत उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कंग्राळी गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सकाळी पुजन करुन करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, यांच्यासह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आर. आय. पाटील यांनी कंग्राळी गावचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, नावगे, कर्ले, बहाद्दरवाडी गावातून आर. एम. चौगुले यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला.
यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते ऍड. सुधीर चव्हाण, श्याम पाटील आणि गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta