
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांनी कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरुवात केले. यावेळी प्रचार फेरी पुढे मार्गक्रमण करत कपिलेश्वर रोड, तंगडी गल्ली, रामामेस्त्री अड्डा, महाद्वार रोड, संभाजी गल्ली, पहिला क्रॉस, मराठा गल्ली निम्मा भाग, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, कांगले गल्ली, पाटील गल्ली, पाटील मळा आणि शनी मंदिर परिसर येथे प्रचार फेरी समाप्त केली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर याना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. यावेळी युवा नेते शुभम शेळके, कपिल भोसले, प्रकाश चौगुले, सुनील बाळेकुंद्री, बंडू भातकांडे, रेणू किलेकर, सरिता पाटील, अनंत चौगुले, रेणू मुतकेकर, महेश मुतकेकर, प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम, प्रसाद मरगाळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहराला गेल्या २४ वर्षात समितीचे आमदार होऊ शकले नाही पण यावेळी समितीचा आमदार निवडून येवू शकतो अशी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर मतदार संघातील मराठी जनतेमध्ये कमाल उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी बेळगाव शहराला समितीचा आमदार मिळून पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी सज्ज असल्याचा इरादा लोकांमधून व्यक्त करण्यात आला. यावेळी गल्लोगल्ली अमर यळ्ळूरकर यांची ओवाळणी करून माता बघिनिनी स्वागत केले. समितीचा आमदार निवडून यावा असा निर्धार सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta