
समितीमय वातावरण; देसुरात जनजागृती; ज्येष्ठासह महिलांचा सहभाग
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अभियंता आर. एम. चौगुले तथा राजू चौगुले यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून सोमवार दिनांक 24/04/2023 रोजी सकाळी सात वाजता देसूर तालुका बेळगाव येथे मोठ्या जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली.
प्रारंभी देसूर गावातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचे औक्षण करून आरती ओवाळण्यात आली आणि ग्रामस्थांच्या वतीने गलोगल्ली सन्मान करण्यात आला. समितीचे उमेदवार निवडून यावा यासाठी शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकांनी सतर्क आणि जागृत असणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी गावात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली.
प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन ग्रामीण मतदारसंघातील समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले प्रमुख उपस्थितीत बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. शाम पाटील, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदगेकर , ॲड. सुधिर चव्हाण, एस. आर. कालकुंद्रीकर, मनोज पावशे, एन. के. कालकुंद्रीकर, सुशांत पाटील, मष्णू पाटील, रोहित तळवार, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुरेश राजूकर यांनी केले. आभार प्रकाश बेळगुंदकर यांनी आभार मानले.
यासह बेळगाव जिल्ह्यातील आजी माजी – विद्यमान तालुका व जिल्हा पंचायत सदस्य, वेगळ्या विविध संघटनेचे पदाधिकारी सदस्य व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना गावातील युवक मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. आणि गावातील सार्वजनिक फलकावरती पाठिंबा देणारे फलक लेखन करण्यात आले होते. गावातील ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने उमेदवाराचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करून “छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी, समितीचा विजय असो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या” उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या आणि परिसर दणाणून सोडला.
पदयात्रा संताजी गल्ली, ताळसेकर गल्ली, पाटील गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज रोड, मधुकर गल्ली, गणपत गल्ली, देसूर आजूबाजूचा परिसर या ठिकाणी प्रचार फेरी काढून जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
देसूर गावासह आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मराठी भाषेचा आमदार निवडून यावा यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. त्यामुळे गावात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. माय मराठीच्या सेवेसाठी सदा प्रत्येकाने तत्पर असायला हवे. होणारा अन्याय अत्याचार याच्यावर वाचा फोडायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकत्र येणे खूप काळाची गरज आहे. वारंवार होत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्यायावर आपण तुटून उठले पाहिजेत. मराठी मधून परिपत्रके, कागद पत्रे मिळवण्यासाठी आपण अनेक वर्ष झगडत आहोत त्यासाठी न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे यासाठीच गावातल्या प्रत्येक नागरिकांनी व्यक्तींनी जागृत होऊन मतदान करणे, आज मराठी भाषिकांची लढाई जिंकायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना बहुमताने निवडून द्यावे अशी गर्जना करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta