बेळगाव :;महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण भागाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचार फेरी सरस्वती नगर, गणेशपुर भागातून आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्या भागात उमेदवार येताच असंख्य कार्यकर्त्यांनी व समिती प्रेमींनी प्रचंड घोषणा देऊन फटाक्यांची आतशबाजी करून सुवासिनींच्या हस्ते निरांजन ओवाळून स्वागत केले गेले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सीमा सत्याग्रही कृष्णा मेणसे यांनी आशीर्वाद देऊन प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी निवृत्ती प्राचार्य आनंद मेणसे, निवृत्त प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी आर. एम. चौगुले यांना शुभेच्छा दिल्या. या प्रचार फेरीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी तसेच स्थानिक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी या भागातील युवा कार्यकर्ते महिलावर्ग व वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक गल्लीवार पंचमंडळी म. ए. समितीचे उमेदवार आणि चौगुले यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. ठिकठिकाणी निरंजन ओवाळून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रचार फेरीत ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा हिरोजी, सदस्य उमेश चोपडे, ज्येष्ठ पंच पिराजी पाटील, अण्णा पाटील, कृष्णा पाटील, बाळू पाटील, जयवंत देवगिरी, टकलू पाटील, प्रदीप तानजी, नीलकंठ पाटील, धर्मराज देवगिरी, मल्लाप्पा पाटील, नागेंद्र उंद्रे, मोहन गरक, सहदेव हिरोजी, रमेश हिरोजी, गजानन पाटील, विष्णू पाटील, दस्तगीर बेळगावकर, जयवंत होंडेकर, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्या प्रचार फेरी आयोध्या नगर, ज्योती नगर, क्रांतीनगर, गंगानगर, हिंदू नगर, शिवम नगर या भागातून समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांनी भरघोस पाठिंबा व्यक्त केला. या फेरीत सेवानिवृत्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजची प्रचार फेरी
उमेदवार आर. एम. चौगुले यांची महाराष्ट्र एकिकरण समितीची दिनांक 27 एप्रिल 2023 चे प्रचार फेरी
गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री व होनीहाळ व संध्याकाळी पाच वाजता निलजी व मुतगा अशी आहे तरी समिती प्रेमींनी सर्वांनी मोठ्या संख्येने प्रचार करीत सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.