बेळगाव : शाहुनगर पहिला बसस्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर व शाडू मातीने बनविलेल्या पेण आणि कोल्हापूर येथील गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी उद्घाटन केले.
श्रावण महिना लागला की घराघरातून वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. दरवर्षी गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या काही व्यावसायिकांनी पेणहून बेळगावात गणपती मूर्ती विक्रीस आणल्या आहेत.
प्रारंभी गणेश मुर्तीची पूजा अनिल बेनके यांनी केले. दीपप्रज्वलन विजय जाधव, सुनील जाधव, गजानन मिसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी नारळ वाढविला, यानंतर प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाहुनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आदित्य पाटील यांच्या निवासी आदित्य पाटील विक्री केंद्रात विक्रीसाठी गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी विक्री केंद्रातील मूर्ती पाहून आमदार बेनके अवाक झाले व म्हणाले शाहुनगर येथील रहिवाशांनी आदित्य पाटील गणपती विक्री केंद्रातून गणपती मूर्ती घ्याव्यात. कारण जेणेकरून या मूर्ती विक्रीतुन जो काही नफा या पाटील कुटुंबियांना मिळतो तो नफा हिंदू समाजास अर्पण करतात.
विजय जाधव यांनी या भागातील समाजसेवक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनात या मूर्ती विक्री केंद्राची सुरवात करण्यात आली आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात काही हिंदू कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या परिस्थितीमुळे त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यास आर्थिक अडचण होती. ही बाब प्रवीण पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी गणेशाची मूर्ती देऊन गणेशोत्सव साजरा केला.
यावेळी रवी कलघटगी, कामराज शहापुरकर, पवन रायकर, रुष खांडेकर, पुनित शिंदे, अभिषेक कोळेकर, अनिकेत रायकर यासह गणेशभक्त उपस्थित होते.