बेळगाव : अलतगा जत्रेला जाऊन परतताना एपीएमसी रोडवरील संगमेश्वर नगर येथील ड्यामरो शोरुम जवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात 1 महिला जागीच ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडली आहे.
अपघातग्रस्त दोघेही रामदेव गल्ली बेळगाव येथील रहिवासी आहेत. सदर अपघातात छाया नागाप्पा भिसे (वय ६०) ही महिला कंटेनरखाली सापडल्याने जागीच ठार झाली तर नागाप्पा भिसे (वय ६८) हे जखमी झाले आहेत. हे दोघे पतिपत्नी जत्रेला जाऊन परतत असताना हा अपघात घडला.
घटनास्थळी एपीएमसी पोलिसांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
Belgaum Varta Belgaum Varta