बेळगाव : अवजड वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या गायीचे प्राण समाजसेवकांच्या तत्परतेमुळे वाचल्याची घटना बेळगावात घडली आहे.
पाटील गल्ली बेळगांव येथे उषाताई गोगटे हायस्कूलसमोर एका गायीला अवजड वाहनाने सोमवारी पहाटेच्या सुमारास धडक दिली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ती गाय रस्त्यावर पडली होती. जबरदस्त मार लागल्याने तिच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते.
याबाबत समाजसेवक भरत नागरोळी यांना पहाटे माहिती मिळताच ते कार्यकर्त्यांसह गाईवर उपचार करण्यासाठी धावून आले. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या गाईला शुद्धीवर आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. श्रीराम सेना हिंदुस्थान, सामाजिक सांस्कृतिक संघटना, बेळगाव आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते समाजसेवक भारत नागरोळी, रवि गोडसे, संतोष दरेकर, प्रा. एन. एन. शिंदे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पशुवैद्यक डॉक्टरांकरवी गायीवर उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात अखेर यश आले.
Belgaum Varta Belgaum Varta