
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर अनगोळ, भाग्यनगर या विभागात आणि पदयात्रा बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी सात वाजता अनागोळ नाक्यावरून प्रचार फेरी आणि पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
अनगोळ नाकावरील स्वयंभू गणेश मंदिर येथे पूजा करून प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांची पूजन करून उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले; यावेळी त्यांचा अनगोळ विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी आणि फलक घेऊन आपले विचार फलकांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. पालकांच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धच्या माध्यमातून हुंदका फोडला. सर्व विभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला. वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून आणि श्री गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला.
स्वयंभू गणेश मंदिर अनगोळ नाका मेन रोड येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भाग्यनगर पहिल्यापासून ते नवव्या क्रॉस पर्यंत सर्व ठिकाणी पदयात्रा करण्यात आली. तर त्यानंतर विद्यानगर कृषी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, अनगोळ मेन रोड, स्वामी विवेकानंद नगर, चिदंबर नगर, मृत्युंजय नगर शेवटी चिदंबर नगर येथील गार्डनकडे प्रचार फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रभाकर पाटील, बी. ओ. येतोजी, माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक राकेश पलंगे, माजी नगरसेवक अनिल पाटील, संभाजी चव्हाण, संजय सातेरी, मोहन भांदुर्गे, दिलीप बर्डे, प्रभाकर बाळू कुरळे, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीधर पाटील, नारायण पाटील, सुनिल बोकडे, सागर गुंजीकर, भारत नागरोळे, मोहन पाटील, रोहन पाटील, निखिल भातखंडे, सुधीर लोहार, प्रभाकर अष्टेकर, चंद्रकांत कोंडुसकर, नारायण कोंडुसकर, श्रीकांत कुऱ्याळकर, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, रवी गोडसे, विजय चौगुले, रोहन पास्टे, प्रवीण कोराने, शरद कोराने, नितीन चौगुले, आशिष कुरणकर, प्रथमेश कुरणकर, संतोष पोटे यासह समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta