बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेते बेळगाव आणि सीमा भागात येऊन आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विक्रम समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला आहे. त्यानंतर आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी बेळगावात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला आहे. त्यानंतर आता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा ते आठ मेदरम्यान कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेळगावला येणार नसून, कर्नाटकच्या कोस्टल एरियात प्रचार करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta