Friday , March 6 2026
Breaking News

धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय निश्चित; रामनगर, वड्डरवाडी आदी भागात समितीचा जोरदार प्रचार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारात जोर धरला आहे. रामनगर, वड्डरवाडी भागात दिनांक ६ मे रोजी सकाळी जोरदार प्रचार करण्यात आला. रामनगर युवक मंडळ, आणि महालक्ष्मी महिला मंडळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांचे धडक्यात स्वागत केले. महिलांनी आरती ओवाळून उमेदवाराचे स्वागत केले. संपूर्ण रामनगर भागात पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला. यावेळी महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहन हावळ, रोहित हावळ, शरद हावळ, कुशल लेंगडे, विशाल लेंगडे, सोमेश लेंगडे, विनायक चौगुले, ओमकार भोपाल, संजय, मोहन हुलजी, चेतन हुलजी, अमोल मनवाडकर, रवी पाटील, प्रेम जाधव, सुमित शहपुरकर, श्लोक शिंदे, प्रेम चौगुले, ओम घोडके, प्रथमेश बाचुळकर, गौरव घोडके आदी कार्यकर्त्यांसह अश्विनी हावळ, सीमा हावळ, गौरी मिरजकर, दीपा मिरजकर, धनश्री मिरजकर, नमिता भारती, प्रियांका भारती, लक्ष्मी बाचुलकर, जयश्री नाईक, सुनीता गिरी, प्रियांका भोसले, शेवंता भोसले यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *