बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दक्षिण मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजाबरोबर इतर समाजाची मते ही निर्णायक ठरतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतून कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर हे निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतील गटातटाचे राजकारण बाजूला सारत यावेळी समितीने एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे मतदारसंघात उत्साह पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती संघटितपणे ही निवडणूक लढवीत असल्याचे चित्रही दिसत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आणि दडपशाही जुगारण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सज्ज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
25 वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेले नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत आलेले आहेत. रिंग रोड किंवा बायपासच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादित केलेल्या आहेत. त्या विरोधात देखील श्री. रमाकांत कोंडुसकर यांनी प्रशासनाविरोध संघटनात्मक लढा दिलेला आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहे. कोरोना काळातील त्यांची कामगिरी पाहता त्यांची समाजाप्रती असलेली आस्था दिसून येते. कोरोना काळात लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना मदतीची अपेक्षा होती मात्र यावेळी लोकप्रतिनिधी घरात तर रमाकांत कोंडुसकर हे रस्त्यावर अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रमाकांत कोंडुसकर हे नागरिकांच्या मदतीला धावून जात असत. कर्नाटक प्रशासनाकडून होणारी मराठीची गळचेपी, शेतकरी व कष्टकऱ्यांना होणारा त्रास, मराठी भाषिकांवर होणारा वाढता अन्याय रोखण्यासाठी रमाकांत कोंडुसकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दक्षिण मतदार संघात मराठी भाषिकांबरोबर इतर समाज देखील आहे. रमाकांत कोंडुसकर हे आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मराठा समाजास बरोबर इतर समाजापर्यंत देखील पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांना समाजातील सर्व स्तरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे.
रमाकांत कोंडुसकर यांना शहरी भागातून तसेच ग्रामीण भागातून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर उद्यमबाग परिसरातील औद्योगिक वसाहती, विविध कामगार संघटनांचा देखील पाठिंबा मिळत आहे. प्रचारादरम्यान महिला औक्षण करून आपला पाठिंबा दर्शविताना पाहायला मिळत होता. मतदारसंघातील माता-भगिनींचे प्रेम पाहता श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी निवडणूक काळामध्ये अनवाणी राहण्याचा प्रन देखील केलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण तसेच सीमा प्रश्नाचे सोडवणूक यासाठी कटिबद्ध आहे. रमाकांत कोंडुसकर देखील हीच ध्येयधोरणे पुढे ठेवून यापुढे समितीमध्ये कार्यरत राहणार आहेत याबद्दल शंकाच नाही. मतदारसंघात शेतकरी आणि कष्टकरी लोकांची मोठी संख्या आहे. विणकर व चर्मकार समाज अधिक प्रमाणामध्ये आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दडपशाहीचे राज्य दक्षिण मतदारसंघामध्ये चालू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे किंवा बायपास रिंग रोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे. त्या विरोधात आवाज उठविण्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत. रमाकांत दादा कोंडुसकर हे स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा ते अगदी जवळून पहात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत.
त्याचबरोबर उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्गांसाठी पीएसआय हॉस्पिटल निर्माण करण्याचा मानस रमाकांत कोंडुसकर यांचा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta