खानापूर : कर्नाटक राज्या विधानसभा निवडणूक खानापूर मतदारसंघात बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला.
तालुक्यातील २५५ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला.
प्रत्येक गावात मतदार शांततेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत होता.
सकाळी ७ ते ९, ९ ते ११, दुपारी ११ ते १ वाजेपर्यत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंद केली जात होती.
खानापूर शहरासह तालुक्यातील ५१ ग्राम पंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद, तहसीलदार प्रकाश गायकवाड लक्ष ठेऊन होते.
अनेक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.
सेक्टर ऑफिसर प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन माहिती घेत होते.
गर्लगुंजी मतदान केंद्र वयोवृध्द महिला स्वता चालत जाऊन मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी मतदान शांततेत प्रारंभ झाले.