बेळगाव : होसूर बसवान गल्ली, शहापूर येथे माजी नगरसेविका सुधा मनोहर भातकांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुधा भातकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.
विनायक काळेनट्टी, परशराम पेडणेकर, जयनाथ जाधव, राहुल जाधव, जगन्नाथ पाटील, संदीप शहापूरकर, तानाजी शिंदे, नगरसेवक नितीन जाधव, जितू देवण, दीपक सोमनाचे, सुनील मुतगेकर, विनायक पाटील, प्रशांत धाकलुचे, सचिन बाळेकुंद्री, प्रशांत नायक, रोहन हुंद्रे, राहुल दुर्गाइ, पप्पू सैनुचे, संदीप कोकितकर, अजय जाधव, योगेश पाटील यांच्यासह २३ जनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
काल मतमोजणी झाल्यानंतर अभय पाटील यांच्या समर्थकांनी विजयोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले होते. फिर्यादी सुधा भातकांडे यांच्या घरासमोर मिरवणूक आल्यानंतर संशयितानी ‘विरोधात निवडणुकीत काम करता, असे म्हणत यांचे घर पेटवू म्हणत घरात प्रवेश करत घरात फटाकडे फोडले. यावेळी परशराम भातकांडे आणि सुजाता संजय शिंदे यांनी असे करू नका, असे सांगितल्याने त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावर फटाकडे टाकण्यासह गुलाले उडविला. त्याचबरोबर संशयितांनी भातकांडे यांच्यावर हल्ला करून अर्वाच शब्दात शिवीगाळ केली. संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी समिती नेते व कार्यकत्यांनी शहापूर पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta