
बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडीतील खानापूर रोडवर भर रस्त्यात डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने चांगलीच तारांबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खानापूर रोडवरील कॉसमॉस बँकेसमोर घडलेल्या या प्रकाराने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता. रहदारीच्या मार्गावरील या घटनेनंतर अग्निशामक दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यामुळे अनर्थ टळला.
Belgaum Varta Belgaum Varta