Sunday , September 8 2024
Breaking News

कावळेवाडी वाचनालयतर्फे किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

Spread the love

कावळेवाडी…. राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी शिवप्रतिमेला प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद यळूरकर होते. उपस्थित मान्यवराना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी प्रा. आनंद आपटेकर यांनी, शिवछत्रपती हेच आपले सर्वांचे दैवत आहे त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून किल्ले उभे करून अभिवादन करतो. किल्ला हे एकतेचे प्रतिक आहे. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या कार्याला सलाम करण्याची ही संस्कृती जोपासण्यासाठी किल्ला प्रतिकृती तयार करतो. बालवयातच शिवरायांच्या संस्काराची गरज आहे. युवकांना प्रोत्साहन व कलागुणांना वाव देण्यासाठी हा वाचनालयचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मौलिक विचार व्यक्त केले.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, उपाध्यक्ष ऍड. नामदेव मोरे यांनीही विचार मांडले.
औचित्य साधून स्वराज्य मंडळचे अध्यक्ष दयानंद यळूरकर, दूर्गामाता मंडळचे गोपाळ जाधव यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विजेते मानकरी…
मोठागट .. प्रथम क्रमांक…संकेत बाचीकर,(वेताळ गड) द्वितीय क्रमांक…सूजल मोरे (सिंह गड)
तृतीय विभागून… ओम् मोरे (पन्हाळा) ज्ञानेश्वर मोरे (रायगड)
लहान गट…. प्रथम क्रमांक… प्रेम बुरुड (सिंहगड) द्वितीय क्रमांक… सूजल यळूरकर (प्रताप गड) तृतीय क्रमांक विभागून… मारुती सुरुतकर(वर्धनगड) परशराम मोरे (प्रताप गड)
यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित …वाय पी नाईक, दयानंद यळूरकर, सूरज कणबरकर, नामदेव मोरे, आनंद आपटेकर, गोपाळ जाधव, कांचन सावंत, पृथ्वी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन मनोहर मोरे, आभार प्रसाद जाधव यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *