Friday , March 6 2026
Breaking News

म. ए. समितीच्या वतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा

Spread the love

 

समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा पुढाकार

बेळगाव : विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि. २७ रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. २६ रोजी निघणार आहे.
या चित्ररथ मिरवणुकीत शहर व उपनगरातील जवळपास ७० हून अधिक सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे चित्ररथ सहभागी होतात. यात सहभागी प्रमुख पात्रांची व इतर पात्रांची संख्याही भरपूर असते आणि त्यांना रंगभूषेसाठी कमीतकमी वेळ मिळतो या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व समिती नेते रमाकांत कोंडूसकर यांच्या पुढाकाराने सहभागी सर्व पात्रांची मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे.
तरी या चित्ररथ मिरवणुकीत सहभागी पात्रांची संख्या व अन्य माहितीसह महादेव पाटील (9481535528), सागर पाटील (9964777565) व विकास कलघटगी (9448470235) यांच्याशी दि.२४ मे पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *