बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट, हिंदवाडी आणि बी के बांडगी ट्रस्ट बेळगाव च्या वतीने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम, सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून शिकलेल्या आणि दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी दहावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह 31 मे 2023 पर्यंत घुमटमाळ मारुती मंदिर, हिंदवाडी येथे किंवा अनंत लाड, द्वारा आनंद ऍडवर्टायजिंग, गिरीष कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली बेळगाव येथे आणून द्यावीत, असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी यांनी केले आहे.