बेळगाव : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र बेळगावात एका तळीरामाने आगळाच प्रताप केलाय. दारूच्या नशेत त्याने चक्क 2 दिवस गटारीतच वास्तव्य केले. काही नागरिकांच्या जागरूकतेमुळे त्याला बाहेर काढण्यात आले.
बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या एका गटारीत एक मद्यपी अडकल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. फुटक्या व दुर्लक्षित गटारीत नशा उतरल्यावर बाहेर येण्याचा केविलवाणा प्रयत्न तो करत होता. हे पाहून काहींनी समाजसेवकांना याबाबत कळविले. समाजसेवकांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून या तळीरामाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर गटारीशेजारीच त्याला आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात उपचारांसाठी पाठवून देण्यात आले. तब्बल 2 दिवस तहानभूक विसरून गटारीत वास्तव्य केलेला हा तळीराम मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे समजते. पण त्याने शनिवारी पगार आल्याने इतकी ढोसली की, तो घरचा रस्ताच विसरला आणि गटारीत राहिला. या घटनेची बेळगावात खमंग चर्चा सुरु आहे.
Belgaum Varta Belgaum Varta