बेळगाव : बेळगावातील बी. ए. सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 2019चा ‘गडीतिलक‘ पुरस्कार नागनूर रुद्राक्षी मठाच्या वचन अध्ययन केंद्र आणि 2020चा पुरस्कार ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांना जाहीर झाला आहे. बेळगावातील कन्नड साहित्य भवनात 12 डिसेंबरला होणार्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण मराठे यांनी कळविले आहे. नागनूर रुद्राक्षी मठाने 1995मध्ये वचन साहित्याचा अभ्यास एकाच ठिकाणी करणे सोपे व्हावे. या उद्देशाने वचन अध्ययन केंद्राची स्थापना केली होती. डॉ. सिद्धराम स्वामी यांच्या प्रयत्नामुळे या केंद्राचा आज मोठा विस्तार झाला आहे. डॉ. सर्जू काटकर हे कन्नड साहित्य विश्वातील एक प्रमुख नाव आहे. साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. साहित्याच्या विविध प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta