बेळगाव : घरगुती भांडणावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पती पोलिसांना शरण आला आहे. ही घटना मुडलगी तालुक्यातील नागनूर गावात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता घडली. बसव्वा हणमंत हिडकल (30) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. आरोपी पती हणमंत सिद्धप्पा हिडकल (35) याच्यावर खुनाचा आरोप आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पती कोणतेही काम न करता इकडे तिकडे हिंडत होता. पत्नी बसव्वा मजुरीचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवायची. पत्नी वेळोवेळी पतीला तू काम करत नाहीस असे बोलून भांडत असे. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि त्याचा शेवट खुनात झाला. या जोडप्याला 10 वर्षांचा मुलगा आहे. खूनानंतर आता वडील तुरुंगात गेले. यामुळे 10 वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta