बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी आज एसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रमाणे बेळगावात समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एसीपी नारायण बरमनी यांना दिले.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना श्री राम सेना व हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर म्हणाले की, कोल्हापूर येथील घटनांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे बेळगाव शहरात समीर तहसीलदार, नईम देसाई या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट टाकून शांतताभंग करण्याचे काम सुरू असून, त्या तरुणांना अटक करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बोलतांना नगरसेवक शंकर पाटील व आदित्य पाटील म्हणाले की, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात स्टेटस टाकले जात आहेत. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. कोल्हापूरची घटना सर्वांना माहीत आहे, बेळगाव शहरातही काही बदमाश हेच करण्याच्या तयारीत आहेत, असे ते म्हणाले. हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात आणि हिंदूंनी प्रक्षोभक प्रतिक्रिया द्यावी, त्यातून समाजातील शांतता बिघडवणे हे त्यांचे काम आहे. समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी काहीसमाजकंटक भावना दुखावणारी माहिती सोशल मीडियावर पसरवत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा लोकांना तत्काळ अटक करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी त्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta