Wednesday , March 4 2026
Breaking News

बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करून मोबाईल लांबविला

Spread the love

 

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी युवकाची दिशाभूल करत मोबाईल पळविल्याची घटना हिंडलगा गणपतीजवळील गांधी चौकात मंगळवारी (ता. १४) रात्री घडली. बेळगावात काम करणारा आंबेवाडी येथील युवक संचित पाटील आपले नेहमीचे काम संपवून रात्री आठच्या सुमारास घराकडे परतत असता लघुशंकेसाठी म्हणून गांधी चौकात थांबला असता, दोघे युवक दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यापैकी एक दुचाकी घेऊन काही अंतर पुढे जाऊन थांबला. तर मागच्या सीटवर बसलेला युवकाने संचित याच्याकडे येत, आपल्या मोबाईल वरील बॅलन्स संपला असून एक महत्त्वाचा कॉल करायचा असल्याने मोबाईल देण्याची विनंती संचितकडे केली. त्यामुळे संचित यांने आपला मोबाईल त्या युवकाच्या हाती दिला. मोबाईल हाती येताच युवकांने तेथून पळ काढला. संचित याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला पण तोवर मोबाईल घेऊनपळालेला युवक पुढे थांबलेल्या आपल्या मित्राच्या दुचाकीवर बसला अन दोघांनी तेथून पोबारा केला. याबाबत कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच किल्ला येथे जुने होलसेल भाजी मार्केट परिसरात एका सेक्युरिटी गार्डला लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे बेळगावात पुन्हा लुटमारीचे प्रकार सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्यासह नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *