Sunday , December 14 2025
Breaking News

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

Spread the love

 

बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्व्याप वाढत चालला आहे. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांवरती कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. नुकताच गोंधळी गल्ली येथील दोन रेडकांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहे का किंवा नसबंदी मोहीम राबविणार आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हल्ला झालेल्या रेडकांवर पशुसंगोपान खात्याच्या डॉक्टरनी तात्काळ उपचार करून रेडकाना बरे केले आहे. मात्र शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढवू लागले आहेत. लहान मुले तसेच वृद्धांना भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. कचरा उचल व्यवस्थित होत नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर त्या ठिकाणी जास्त झालेला दिसून येत आहे. कचऱ्याच्या ढिगात अन्न किंवा टाकाऊ पदार्थ खायला मिळत असल्यामुळे कुत्र्यांचा कळप त्या ठिकाणी जास्त दिसून येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा व कुत्र्यांसाठी नसबंदी मोहीम अधिक सक्रिय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील भटके जनावरे आणि कुत्री टाकाऊ पदार्थांवर तुटून पडत आहेत. दरम्यान खाण्यासाठी एकमेकांवर हल्ले होऊ लागले आहे त्यातूनच जनावरे जखमी होण्याचे प्रमाणही अधिक वाढले आहे. विशेषतः लहान जनावरांचे लचके तोडले जात आहेत. यादरम्यान जनावरे गंभीर जखमी होऊन दगावल्याच्या घटनाही घडलल्या आहेत. यापूर्वी जखमी झालेल्या भटक्या जनावरांना श्रीनगर येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरातील कचरा उचल व्यवस्थित करून भटक्या कुत्र्यांचा देखील बंदोबस्त करण्यात यावा, अशी सामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

Spread the love  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *